मनाने ध्यास हा धरला, चला शेगावि बघण्याला
(चाल-प्रभू हा खेळ दुनियेचा...)
मनाने ध्यास हा धरला, चला शेगावि बघण्याला ।
अवलिया संत नांदतसे, गजानन ! म्हणति जन त्याला ।।धृ0।।
हजारी लोक जाऊनिया, समाधी वंदिती भावे ।
पावती भक्तिच्या मार्गे, आम्ही ही जाउ तरण्याला ।।१।।
नसे त्या पंथ अणि पक्ष, नसे कुणि रंग - बेरंगे ।।
सदा अलमरस्त ते राहती, ब्रह्म-स्वरुपात सजण्याला ।।२।।
असो स्त्री-पुरुष वा कोणी, राव वा रंक अज्ञानी ।
स्पृश्य-अस्पृश्य ही कोणी, मुळी नसे भेद हा कळला ।।३।।
आपुले सूख - दु:खेही, जाणती सन्त सह - भावे ।
म्हणे तुकड्या शरण गेलो, कृपेने संत तो वळला ।।४।।
-दिग्रस,नागपूर प्रवास दि. 0५-0९-१९६१