या प्रीय भारताचा जीवप्राण बापु गेला ( गांधी गीतांजली )
(चाल : या प्रीय भारताचा का वीट...)
या प्रीय भारताचा जीवप्राण बापु गेला ।
झाली महान हानी भरवे न ही कुणाला ।।धृ0।।
चरखा धरोनि हाती तत्वार्थ सूत काती ।
त्यानेच पार तोडी परदास्य - शृंखलेला ।।१।।
शेतात राबणाऱ्या मजुरासमान रही ।
अन्याय हा जराही सहवे न त्या जिवाला ।।२।।
सेवा करावयाची जमनता - जमार्दनांची ।
ही नित्य बाणि ज्याची आदेश दे जनाला ।।३।।
हे जाति - पंथ सारे अति झूट स्पष्ट सांगे ।
परधर्म हेहि सारे असती समान ज्याला ।।४।।
अपल्याच कीर्तिने जो झाला जगी महात्मा ।
अन्यायवृत्तिने पण त्यावरहि कहर केला ।।५।।
तुकड्या म्हणे युगाचा, मानव्यता जगाचा ।
हे राम ! राम ! ! म्हणता रामीच लीन झाला ।।६।।