भारतभूच्या प्रीय महात्म्या ! ( गांधी गीतांजली )

(चाल: कृष्ण कृष्ण मैं पुकारु...)
भारतभूच्या प्रीय महात्म्या !
तव यश   विजयी   राहू   दे ।।
स्वतंत्र झालेल्या देशाला, पुढे पुढे सरसावू दे ।।धृ0।।
क्षमा करी अपराध आमुचा, जो तुझ्याप्रति जाहला ।
वर्ष - वर्ष ना मिटे, जो डाग   हृदया   लागला ।
अज्ञ म्हणुनी सोड, पश्चाताप मानसि पावू दे ।।१।।
पूर्ण करण्या भावना तव, शक्ति सगळ्यांना असो ।
रामराज्यचि हो पुन्हा, ऐसी जनी भक्ती दिसो ।
पक्षांधता मतभिन्नतेचा द्वेष विलया जाऊ दे ।।२।।
कीर्ति व्यापू दे तुझ्या दुरदृष्टिची या    भूवरी ।
सत्यतेची-शांततेची रंगु   दे  जग - वैखरी ।
दास तुकड्या मागतो, मज नित्य तव गुण गाऊ दे ।।३।।