पाहता काय लोकांनो, जवळ ही लाभली काशी
(चाल : अगर है ग्यान को पाना...)
पहाता काय लोकांनो, जवळ ही, लाभली काशी ।
कशाला धावुनी जाता, उभा हा खास अविनाशी ।।धृ0।।
तिथे पाषाण शोधावा, इथे प्रत्यक्ष ओलावा ।
दोन्ही ही पावती भावा, अनुभवा येत सकळासी ।।१।।
संत हा प्रगट शेगावी, हजारो लोक गाताती ।
चला जाऊ तया शरण, चुके चौऱ्यांशिची फाशी ।।२।।
कसोटी उतरला भक्ता, गजानन ! संत योगी हा ।
लाभला कीर्तिचा साचा, सांगती दास अणि दासी ।।३।।
समाधी भासतो जागा, दिसे जागेपणी विरला ।
म्हणे तुकड्या धर ग्यानी,दिसे साक्षात गुणराशी ।।४।।