यारे या प्रौढांनो ! साक्षर होण्यासाठी सर्व जमू !

(चाल: अवताराचे कार्य कराया...)
यारे या प्रोढांनो ! साक्षर होण्यासाठी सर्व जमू !
मातांनो ! या, मिरा, जनाई, मुक्ताईचा मार्ग क्रमू ।।धू0।।
निरक्षराला कोणि न पुसती,
ऐसा   आला    काळ   अता ।
समाज-शिक्षा या साठिच ही, अपुल्या गावोगावि रमू ।।१।।
उत्तम राहूनि, मधुर बोलुनी,
शरीराला    सुदृढ    करूनी,
देशासाठी सर्वचि जागू सानथोर हा मार्ग क्रमू ।।२।।
पूज्य महात्मा गांधी अपुल्या,
देशाचा        नेता       गेला ! !
त्यांची उरली इच्छा पुरती, करण्यासी गुरुदेव नमू ।।३।।
समुदायाने भजन   करू,
प्रार्थना करु सद्भावाने ।
भारतमाता उन्नत व्हाया, सेवाप्रेमे संदा श्रमू  ।।४।।
स्वतंत्र  झाला   देश   खरा ,
पण शेतकरी दु:खी अजूनी ।
तुकड्यादास म्हणे यासाठिच, साक्षर होउनि देश भ्रमू ।।५।।