या रे या, मजुरांनो ! या

 या रे या , मजुरांनो ! या ,
जमिनदारांनो ! या, सावकारांनो ! या ,
करु खेड्यांची सुधारणा काही हो ।।धृ0।।
ज्यांचे राबतील बाहू,त्यांना जमीन देऊ
येरां भूमीचि मालकि न काहि  हो ।।
जो धंदा करिल, तोच पोट भरिल ।
कोणि भिकारि ठेवायचा नाहि हो ।। या रे या0।।१।।
सारे काम करु, ना काळा   डरू ।
आमुच्या गावात घाण नसावि हो ।।
करु मार्ग सुंदर, बांधू विहिरी-नहर ।
कुडा-कचगरा मुळि दिसायचा नाहि हो ! ।। यारे या0।।२।।
गावि बांधू शाळा, करू सुंदर मळा ।
गुंडगिरी नि    चोरी    नसावि    हो ।।
ऐका तुकड्याची हाक सांगा सर्व लोकात ।
आता उशीर  करायचा  नाहि  हो ।। या रे या 0।।३।।
                                     - पंढरपुर, दि.२२-0७-१९५३