पंढरीये मज जादू केली कोणी

पंढरिये मज जादू केलि कोणी । 
कळो द्या हे मनी झटो त्यासी ॥
आम्ही सहज गेलो बाटसरुसंगे । 
जाता चंद्रभागे बरे आलो ।।
दिसले निशाण भगव्या रंगाचे । 
तेथेचि अंगाचे पाणी झाले ॥
उठले रोमांच गळा दाटियला । 
अंगी संचरला अष्टभाव ॥
नाद ऐकू येता ओढले हे मन । 
विसरले भान साथियांचे ॥
तुकड्यादास म्हणे महाद्वारी येता। 
तन्मयता चित्ता झाली माइया ॥