बहुता भक्ताची घेतली करुणा

 बहुता भक्तांची घेतली करुणा । 
मज ऐशा दीना सोडू नको ॥
जरी अधिकारी नाही त्या गाविंचा । 
तुझिया दासांचा दास करी ।।
झाड़ीन रजधूळ संताचिये घरी । 
करीन चाकरी श्वाना ऐसी ।
तुकड्चादास म्हणे अगा पंढरिराया !
आपुलिया पाया ठेवा मज ॥