मायबापे प्रेमा केला ! सर्व स्वार्थाचा गलबला

मायबापे प्रेमा केला । सर्व स्वार्थाचा गलबला ।।
मित्र चालतीचे झाले । आपत्काळी हे पळाले ॥
गोत्र दिवाळीचे साथी । नाही तरी दूर होती ॥
तुकड्या म्हणे खरा साथ
। माझा एक सद्गुरूनाथ ।।