आवडले मनी रामरूप मज
आवडले मनी रामरूप मज । करीन सहज ध्यान त्याचे || धृ ||
चाप हातीं धरी असुरा संहारी ।
दुष्टासी विदारी शक्तिरूपे ||1||
सुंदर ते ध्यान बसे माइया मनी ।
आनंदे कितनीं गईन मी ||2||
तुकड्यादास म्हणे भेटो मज आजीं ।
करितसे अर्जी ध्यानी ध्यातां ||3||