धाव रे गोविंदा ! श्रीकृष्णा मुकुंदा

धावरे गोविंदा ! श्रीकृष्णा मुकुंदा ! 
 घेवोनिया गदा दिनासाठी || धृ ||
आम्हा नाही तारू तुझ्या नामावीण ।
 तोड़ हे बंधन भ्रांति सारी ||1||
येऊ दे करुणा सख्या ! नारायणा !
जगाच्या जीवना पांडुरंगा ! ||2||
तुकड्यादास म्हणे पुरावा ही आस । 
नका हो उदास करू देवा ||3||