फुटल्या कपाळे तू काय करिसी

फुटल्या कपाळे तू काय करीशी ?। 
हे सर्व आम्हासी भोगा आले ||धृ ||
पूर्व-जन्मी  केले ते आजी पाहिले ।
आता चुकारिले काय जाते ? ||1||
भोगावे सुखाने असेल जे दैवी । 
ठेवोनी केशवी वृत्ति सर्व ||2||
तुकड्यादास म्हणे पुढे नका देऊ ।
देवा ! पायी राहू ऐसे करा ||3||