देवा तुझं काय कमी आहे सांग

 देवा ! तुज काय कमी आहे सांग ?। 
आम्हालागी भीक मागतोसी ||धृ ||
सात समुद्राचे पाणीं तुजसाठी । 
स्नान जगजेठी ! करावया ||1||
एका आचमनी कैंसे होय स्नान ? । 
म्हणतील कोण केसे मज ? ||2||
तुकड्यादास म्हणे सर्व तुजपाशी ।
काय तू आम्हासी धणी मागे ? ||3||