कृपा करावया काय तुम्हा पासी
कृपा करावया काय तुम्हापाशी ? ।
कराल ती कैसी कृपा देवा ! ||धृ ||
पहाल आमुचे खाते संचिताचे ।
फळ द्याल साचे तैसे तुम्ही ||1||
सुखदुःख भोग भोगवाल जगी ।
गुणकर्मालागी वर्णावर्णी ||2||
तुकड्यादास म्हणे तुमच्याने नव्हे ।
पापिया तारावे कोण जाणे ? ||3||