प्रिय तुझी कथा ऐकताना कानी

प्रिय तुझी कथा ऐकतांना कानी । 
देह भाव मनी नुरे माझ्या ||धृ ||
अंगी भरे वारे हाल ये नामाचे । 
हृदयाकाशी नाचे वृत्ति माझी ||1||
उधर्व जैसी तनू उडे चेंडूसम
लाज लज्जा भ्रम नुरे तेव्हा ||2||
तुकड्यादास म्हणे ऐसे हो अखंड । 
मागणे उदंड मागो देवा ! ||3||