प्रिय सर्वाहूनी गोड नाम साचे

प्रिय सर्वाहूनी गोड नाम साचे ।
घेतांना या वाचे सुख वाटे ||धृ ||
ऐसे नाम घेता मागावी तुच्छता । 
हे तो माझ्या चित्ता नये कदा ||1||
नामे जरी प्रेम वाटे देवराया !
तरिं मज घ्याया हेचि द्यावे ||2||
तुकड्यादास म्हणे प्रेम मी वाहीन । 
नेत्राने पाहीन रूप तुझे  ||3||