कळते हे सर्व उमजेना काही
कळते हे सर्व उमजेना कांही ।
देव याची ग्वाही देती माझे
काय करू मन नावरे अभ्यासे ? ।
संसाराच्या आशे वेड लावी ॥
सुटेना आसक्ती द्रुढ झाली चित्ता ।
ओढते मागुता भोगरूपे ।।
तुकड्यादास म्हणे संत मायबाप !।
तोडा माझे पाप कृपा करा ॥