नाशिवंन्त देह जाणार सर्वदा
नाशिवन्त देह जाणार सर्वदा ।
भजावे गोविंदा भक्ति- भावे ||धृ||
काय न्याल सवे छाती घालोनिया ।
साथी संगातिया कोण चाले ? ||1||
आजे बाप गेले त्यांनी काय नेले ? ।
एकलेचि मेले जगामाजी ||2||
तुकड्यादास म्हणे करा कीर्ति काही ।
जगी याद राही लोका ऐसी ||3||