देह गेलियासी मृत्यू कोण म्हणे

देह गेलियासी मृत्यु कोण म्हणे ? । 
म्हणती अज्ञाने कांही लोक ||धृ ||
खरा मृत्यु तोचि अंगी घड़े पाप । 
नाक अधोरूप होय जगी ||1||
संत महंत ते जिवतचि आहे । 
कीर्ति गर्जताहे लोकी ज्यांची ||2||
तुकडयादास म्हणे काही पुण्य करा । 
संत-पाय  धरा जीते व्हाया ।||3||