नाही शुद्ध आचरण

नाही शुध्द आचरण । 
कैसे पावाल हे गुण ||धृ ||
दिवस निघाला तातडी। 
कैसे जाल पैल थडी ||1||
कोण पुरवील आस ? । 
जेव्हा देह हा निराश  ||2||
तुकड्या म्हणे नका करू । 
पापे न पावे आदरू ||3||