धरोनिया काळ कधीसा नेईल

धरोनिया काळ कधीसा नेईल । 
नेम ना राहील काही याचा ||धृ ||
उग्ररूप केले कलिने आपुले । 
वाटे तैसे नेले  लोक काळे ||1||
काही रोगरूपे कही दैन्यरूपे । 
कांही मृत्यू रूपे अकस्मात ||2||
तुकड्यादास म्हणे सावधान रहा । 
आपुलिया पहा हितगुजा ||3||