कधी काय होय कोण सान्गे यासी
कधी काय होय कोण सांगे यासी ।
म्हणोनी मानसी लीन व्हावे ||धृ ||
करावे चिंतन मनी देवाजीचे ।
क्षण क्षण त्याचे जावे कामी ||1||
आयुष्य हे थोडे कलियुगामाजी ।
त्यातही नाराजी देवाजीची ||2||
तुकड्यादास म्हणे पंधरा वर्षात ।
चाळीसाचे आत मरती बहु ||3||