धरू नका गर्व आपुल्या देहाचा
धरू नका गर्व आपुल्या देहाचा ।
नाही भरवसा क्षण एक ||धृ ||
शिकारी टपूनी वाट पाहे वरी ।
कधी ग्रास करी नेम नाही ||1||
साधा काय साचे असेल साधणे ।
नाहीतरी जाणे गर्भवासी ||2||
तुकड्या म्हणे प्रभू करारे आपुला ।
तयाविण गेला काळ व्यर्थ ||3||