नको काळ घालू नारायणाविण
नको घालू काळ नारायणाविना ।
जरी तु शहाणा असशील ||धृ ||
अरे ! नरतनु अमोल ही तुज ।
साधी साधी गुज काही तरी ||1||
नये ऐसी पुन्हा वेळ ती कधीही ।
पाही लवलाही ब्रह्मरूप ||2||
तुकह्यादास म्हणे स्वरूपी राहणे ।
नम्रता घरणे हाचि धर्म ||3||