देवा तुजपाशीं ऐसा का रे द्वेष

देवा ! तुजपाशी ऐसा का रे द्वेष 
ठकवुनी आम्हास भुलविसी ||धृ ||
काय तुझ्या हाती नाही सांग बरे ? 
आम्हा या संसारे दुःखी केले ||1||
तुझे म्हणवोनी हे पाश भोगावे । 
माझिया केशवे ! शोभे कैसे ? ||2||
तुकड्यादास म्हणे दयावंत होसी । 
नामासम कैसी करणी नाही ? ||3||