फावलीया मज पाहशील डोळा
फावलिया मज पाहशील डोळा ।
तरी कळिकाळा टाळू आम्ही ||धृ ||
समर्थाच्या दासा कधी दुःख नोहे ।
संतांचे वाक्य हे ठावे सर्वा ||1||
जरा अवलोकिशी कृपे न्याहाळोनी ।
पाप हे जळोनी जाय माझे ||2||
तुकड्यादास म्हणे आहे भरवसा ।
आपुलिया दासा तारी देव ||3||