आठवते तरी आवडेना जरा

आठवते तरी आवडेना जरा । 
म्हणोनी माघारा होतो आम्ही ||धृ ||
आवडी लागणे देणे तुझे देवा !
ऐसे अनुभवा कळो आले ||1||
वाचोनी ऐकोनी नोहे समाधान । 
तेथे हवे मन निरंतर ||2||
तुकड्यादास म्हणे करा मज पिसे । 
मन हे न बसे विषयांवरी ||3||