देवा आवरा ही माया

 देवा ! आवरा ही माया । मनोजया ने विलया ||धृ ||
करू न दे योगाभ्यास । 
भूत लाविते अंगास ||1||
काम क्रोधाची उधळी । 
लागे मना देह जाळी ||2||
तो तुकड्यादास म्हणे । 
झालो पिसा या पायेने ||3||