नाडलो कुसंगे केले विपरीत

नाडलो कुसंगे केले विपरीत ! 
करु नये तेथे केले काही ||धृ ||
मांडली उपाधी कराया साधने । 
तेथेही दैवाने हाक दिली ||1||
ऐसिया प्रसंगी तूचि सांभाळिले । 
वेळोवेळा केले सावधान ||2||
तुकङ्यादास म्हणे हे तो तुझे ब्रिद। 
पतिता दुःखद होऊ नेदी ||3||