धोंड माझी भक्ति रुचेल का देवा

धोंड माझी भक्ति रुचेल का देवा। कैसा तू केशवा ! वश होशी ? ||धृ ||
बैंकुंठात राहे गाणार गंधर्व । आम्हासी हे सर्व ठावे आहे ||1||
रिद्धि सिद्धि तुझ्या करिताति सेवा। आमुचिया भावा कैसा येशी ? ||2||
तुकङ्यादास म्हणे भोळे आहो आम्ही । आम्हा नाही उम्मी अहंकाराची ||3||