पठण पाठण नाही आम्हा झाले

पठण पाठण नाही आम्हा झाले । ग्रंथ अवलोकिले नाही कोणी ||धृ ||
चित धाव घेई तुझिया स्मरणा । व्यसनचि मना लागले हे ||1||
भीति वाटे शास्त्री कोठे भेद पडे । 
शास्त्राचे पवाडे द्वैतरूप ||2||
तुकड्चादास म्हणे ग्रंथ धुंडाळिता । 
झणि माझ्या चित्ता भेद होई ||3||