भक्ति आंधळ्याची काठी।

भक्ति आंधळ्याची काठी। 
लावी मुक्तिचिया वाटी ||धृ ||
अंगी राहे प्रेम-झरा । 
गुण देतसे अंगारा ||1||
पथ्ये पळे दूर रोग । 
तरी औषधीचा संग ||2||
तुकड्यादास म्हणे भाव । 
भाविकासी पावे देव ||3||