धोपट हा मार्ग राजरोस चला । आळवा विट्ठला मनोभावे
धोपट हा मार्ग राजरोस चला । आळवा विट्ठला मनोभावे ||धृ ||
तयावीण नाही साधन या युगा । चला उठा निघा भक्तिमार्गे ||1||
यमनियमाच्या पडोनिया भिडे । खोवाल रोकडे आयुष्य है ||2||
तुकङ्यादास म्हणे कानी घ्या ही हाक । ठेवा जरा धाक यमाचा तो ||3||