धाकू नका मनी कुणीही संगिन । धरिता चरणे शुद्धभावे ||

धाकू नका मनी कुणीही संगिन । 
धरिता चरणे शुद्धभावे ||धृ ||
परमात्मा पाहे तयाचीच वाट ।
येतो मनी नीट शुद्धभावे ||1||
सर्व-साक्षि त्यासी भाव सर्व ठावे । 
मन शुद्ध व्हावे भक्तिमा्रगे ||2||
तुकड्यादास म्हणे निर्भय व्हा मनी । 
भेटेल येवोनी देव माझा ||3||