धनीकांचा धनी रंका धरी हाती

धनीकांचा धनी रंका धरी हाती । 
ऐसी आहे ख्याती भगवंताची ||धृ ||
शुद्ध प्रेम कोणी धरा रे अंतरी । 
आळवा श्रीहरी भक्ति- पंथे ||1||
येवोनिया भेटे तेथेचि प्रगटे । 
मन उफराटे होय जेव्हां  ||2||
तुकड्यादास म्हणे भावाचिया घरी। 
देव पाणी भरी कीर्ति त्याची ||3||