प्रभु प्रेम करी सर्व जीवावरी । आपुलियापरी पाहे जना ||
प्रभु प्रेम करी सर्व जीवावरी ।
आपुलियापरी पाहे जना ||धृ ||
वाट पाहे कधी लोक बोलविती ।
ऐकताचि जातो धावोनिया ||1||
सोडोनी गरुडा धाव घेई पुढे ।
ऐसे प्रेम गाढे देवा-अंगी ||2||
तुकड्यादास म्हणे सर्व आहे परी ।
राहतो भिकारी देव भावा ||3||