माझे शब्द तुझ्या बोचतील कानी

माझे शब्द तुझ्या बोचतील कानी । 
म्हणशील मनी पापी बोले ||धृ ||
ऐसा आम्ही केला दुष्ट सहवास । 
अज्ञानाची रास थोर अंगी  ||1||
कधी तुज नाही तोषविले अंगे । 
विपयाच्या संगे काळ गेला  ||2||
तुकड्यादास म्हणे काहि तरी करा । 
मजसी उद्धरा पांडुरंगा ! ||3||