काय कराल ते करा माझियाने

काय कराल ते करा माझियाने । 
मी तो सर्व-पणे दुबळा झालो ||धृ ||
शक्ति नाही अंगी सेवा करायाची।
 व्यर्थचि मनाची धाव वाहे ||1||
द्रव्य- हीन आम्ही होईना सहाय्य । 
पोटाचीच सोय नाही कांही ||2||
तुकड्यादास म्हणे पांगुळलो आता । 
पावन पतीता करा देवा ! ||3||