मासा पाण्यावीण तळमळे सारखा

मासा पाण्यावीण तळमळे सारखा । 
तैसे झाले एका देवावीण ||धृ ||
रुचेना पक्वान्न खाणे पिणे काही । 
समाधान नाही देवावीण ||1||
चालता बोलता वीट वाटे जिवा 
कोठे ना विसाया देयावीण  ||2||
तुकड्यादास म्हणे काय सांगू तुम्हा । 
जीव हा रिकामा देवाविण ||3||