भजा, भजा गुरुराज सर्वदा, भक्तिरुप त्या भजा
भजा, भजा गुरुराज सर्वदा, भक्तिरुप त्या भजा ।
उजळवा निज प्रेमाची ध्वजा ।॥|धू०॥।
कोणि नसे भव-पुरी तारण्या, त्या सद्गुरुच्याविना ।
स्वारथी येउनि टपले धना।।
बाप - बंधु- सुत- दार, दरारा, बैभव राही घरी।
अंति मग कोण करिल चाकरी ?।।
शाल, दुशाले, हत्ती - घोडे, राहती घरचे घरी ।
लक्ष दे, ऐक गोष्ट ही पुरी।।
(अंतरा) तुज सांग, कशी रे! पडली झापड गड्या ?
हे कुणी शिकविले घ्याया भविच्या उड्या?
कुठवरी करिशि ही मजा? सांग, बापुड्या !
कोण वेभवी टिकले बापा? चुकली कवणा सजा १।।उज० ।।१॥।
कोणि नसे २े ! देवत त्याहूनि, बाप-बंधु फाकडे ।
सर्वही अंति होति वाकडे ।।
जाइल जव तव प्राण, क्षणिक हे गोत तुझे फडफडे ।
पाहि अनुभवास या रोकडे ।।
करुणाघन कैवारि दीनाचा, तोडिल सारे बिडे।
प्रेम जरि करिशी या एवढे ।।
(अंतरा) ळा चुकला समजुनि? उमज घेटट अंतरी ।
उठ निजू नको, ही वेळ नसे बा ! बरी।
विक्राळ काळ तो बसला छातीवरी ।
नको घालवू वय संसारी, रोरख होइल सजा ।। उज० ।।२॥।
विपत्ति, भव-रोगास ओषधी, सद्गुरु-पाया धरी ।
पार होशिल या भव-सागरी ।।
सोड आस, नव मास-त्रास हा, पुरे करी आपुला ।
चुकवि सद्गुरू दयाघन भला ।।
जग-कल्याणा जग-प्रवेशी, दावायासी कला ।
सद्गुरू" दयाळ अवतारला।।
(अंतरा) बघ, नको गांजवू जीव आपुला मधी |
हो मुक्त असुनिया देह, विदेही अधी।
श्रीगुरु आडकुजी पाहुनि हरि भव-नदी ।
तुकड्यासी दे ठाव सर्वदा, भोगी निज सुख मजा ।।उज० ।1३॥।