कोणीकडे जाऊ तुज कोठे पाहू ?

कोणीकडे जाऊ तुज कोठे पाहू  ? । 
कैसियाने राहू समाधानी ?  ||धृ ||
तुजविना वाटे ओस दाही दिशा । 
गमेना मानसा कांही केल्या ||1||
भेट दे येवोनी सांग कुठे येऊ ? । 
केव्हातरी पाहु ऐसे झाले ||2||
तुकडथादास म्हणे नलगे सांगावे । 
उनित ते द्यावे प्रेम मज़ ||3||