नाशि्वत देह जाणार सर्वदा । भजावे गोविंदा भक्ति भावे ||

नाशि्वत देह जाणार सर्वदा । 
भजावे गोविंदा भक्ति भावे ||धृ ||
काय न्याल सवे छाती घालोनिया । 
साथी संगातिया कोण चाले ? ||1||
आजे बाप गेले त्यांनी काय नेले ?। 
एकलेचि मेले जगामाजी ||2||
तुकड्यादास म्हणे करा कीर्ति काही । 
जगी याद राही लोका ऐसी ||3||