मी मी काय ऐसे बोलसी वचन

 मी मी काय ऐसे बोलसी वचन !। 
काय हे कोठून आणलेसि? ||धृ ||
धन कुबेराचे येईल का साथी ! । 
कोण राहे अंती सांग मज ? ||1||
रेड्या जैसे देह पडले धरणी । 
काळाच्या मारणी मेले लोक  ||2||
तुकड्यादास म्हणे तुझे काही नाही । प्रेम-भक्ति येई सांभाळाया ||3||