मी मोठा म्हणतां काय तुजपाशी

मी मोठा म्हणतां काय तुजपाशी ? 
वासनेचा होसी गुन्हेगार ||धृ ||
विषयांचा बैल बाहेरी फिरसी । 
कामिनीची होसी बाईल तू ||1||
पोटाचा किंकर जरा शांति नाही । 
मानासाठी हायी करिसी सदा ||2||
तुकड्यादास म्हणे मोठा तोचि एक । 
जयाची नि:शँक  वृत्ती झाली ||3||