पैशियांनी मोठा राहील का कोणी ?

पैशियांनी मोठा राहील का कोणी ? । 
तरि बोलो क्षणी लक्ष द्यावे ||धृ ||
वेश्याचिये घरी धनाचेहि हांडे । 
कां म्हणता रांडे तिला तुम्ही ? ||1||
चोराचिया घरी थन गाडविले। 
तया लोक भरले  म्हणती कैचे ? ||2||
तुकड्यादास म्हणे पैसा नाही मोठा ।
घालतो उलटा नरकांमाजी ||3||