नका नका गर्व धरू । नाहीतरी जाल हारू

नका नका गर्व धरू । 
नाहीतरी जाल हारू ||धृ ||
पक्ष-घेता नाही कोणी । 
एका भगवंता वाचोनी ||1||
नित्य सांभाळावे जीव । 
तरीच दया करी देव ||2||
तुकड्यादास म्हणे नाम । 
जपा धरूनिया प्रेम ||3||