पंढरीचे सुख नाहि कोण्या धामा
पंढरीचे सुख नाहि कोण्या धामा ।
नामाचा महिमा पंढरीसी ||धृ ||
काशी प्रयागासी दंडण मुंडण ।
गये पिंडदान गंगेकाठी ||1||
तैसा नाहे मार्ग माइया पंढरीचा ।
तेथे या कर्माला लेश नाही ||2||
तुकड्यादास म्हणे नामसंकीर्तन ।
चाले रात्रंदिन पंढरीसी ||3||