मध्यप्रदेश मधील नेपानगर येथे २७/०५/१९६५ मध्ये दिलेले भाषण
मध्यप्रदेशातील नेपानगर हे आधुनिक भारताचे एक तीर्थस्थान आहे. वर्तमानपत्री कागदांचा एक टोलेजंग कारखाना भारत सरकारने येथे उभारला आहे. या कारखान्यातील कामगारांसाठी मध्यवर्ती सरकारच्या वतीने श्रमिक शिक्षाकेंद्र चालू आहे. या केंद्राला दि. २७/०५/१९६५ रोजी भेट दिल्यावर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जे विचार व्यक्त केले ते येथे घेतले आहेत. -संपादक)
मित्रहो ! तुम्हाला या शिक्षण विभागाच्या संस्कार केंद्रात
भेटतांना मला अतिशय आनंद झाला. भारताच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक केंद्रे चालू आहेत. काळ बदलला की शिक्षणाच्या पद्धतीही बदलतात. आजच्या काळाची मागणी जरा वेगळी आहे, आणि ती.
म्हणजे प्रत्येकाने आपले काम इमानदारीने करावे. सर्वांनी आपल्या मर्यादांचे भान ठेवावे.
माणसाचा मूळ स्वभाव :-
माणसाचा मूळ स्वभाव बेजबाबदारपणा हा आहे. माणसाचे मन वाईट संस्कार लवकर ग्रहण करते. चांगले संस्कार घेण्यासाठी त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आणि इतके करूनही यश येतेच असे नाही.
निसर्गात माणूस एकदम जन्माला आला नाही. मागील
जन्मात तो निरनिराळे प्राणी होता. सर्व प्राण्यांचे संस्कार एकत्र झाले आहेत. म्हणून माणूस जन्माला येणे आणि माणूस बनणे या दोन गोष्टी अत्यंत भिन्न आहेत. जगातले लहान-लहान देशसुद्धा आपापल्या कामाला चिकटून राहिल्याने कितीतरी पुढे गेले आहेत. आज आपलाही चेहरा बदलू लागला आहे. या देशातली साधारण माणसे, लहान मूले,
[10/10, 5:44 PM] Suraj Apturkar: नवजवान सैनिक हे सर्वच देशावर प्राण देण्यासाठी तयार आहेत. परंतु एवढ्यावरच आपण आनंद मानू तर दुर्दैवी ठरू, अजून घोडामैदानलांब आहे. कसून तयारी केली पाहिजे.
प्रत्येकाने आपल्या कामामधले ज्ञानविज्ञान आत्मसात केलेपाहिजे. भगवंतांनी अर्जुनाला गीता-ज्ञान दिले आणि शेवटी सांगून टाकले की या ज्ञानाचा अर्थ तू संन्यास घ्यावास असा नाही. तू शूर आहेस. तरुण आहेस. तू युद्धात पराक्रम गाजव. ब्रह्मज्ञानानंतर युद्धाची काही एक आवश्यकता नाही ही अर्जुनाची भावना होती. परंतु श्रीकृष्ण सांगत होता की, कर्माचा खरा आरंभ ब्रम्हज्ञानाच्या प्राप्तीनंतरच होतो.
बह्मज्ञान म्हणजे कर्तव्याची ओळख :-
आणि गीतेचा हाच खरा संदेश आहे. आपल्यापुढे जे कर्तव्य असेल त्याच्या सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घेणे याचा अर्थ ब्रह्मज्ञान. मी जे काम करीत आहे ते अधिक सुंदर करणे, अधिक व्यवस्थित करणे हाच माझा धर्म आहे. तीच माझी पूजा आहे. तीच माझी
साधना आहे. गुरे चारणे हे सुद्धा एक पवित्र पूजाकार्य आहे. जगात कोणतेच काम कनिष्ठ प्रतीचे नाही. सारीच कामे समान दर्जाची आहेत. श्रेष्ठ आहेत.
कोणताही कामगार असो, जोपर्यंत तो स्वत:ला देशाच्या
यंत्रणेतला एक भाग मानणार नाही तोपयंत तो काही काम करू शकणार नाही असा माझा स्पष्ट समज आहे. मित्रहो, देशाचा ध्येयवाद समोर ठेवून आपल्याला काम करायचे आहे. देशाची मागणी समोर ठेवून अनेक कर्तव्ये आपल्याला पार पाडावयाची आहेत.सयमपूर्वक
आणि विचारपूर्वक आपल्याला पवित्रा घ्यावयाचा आहे.
पाप आणि पुण्य :
पाप आणि पुण्य यांच्या व्याख्या अनेक असतील. तेवढ्या
[10/10, 5:44 PM] Suraj Apturkar: खोल तपशीलात मी शिरू इच्छित नाही. माझी आपली पाप आणि पुण्याची अत्यंत साधीसोपी व्याख्या आहे. परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. जाणून बुजून दुसऱ्यास त्रास देणे याचे नाव पाप. आणि दुसर्याचे भले करणे, लोकांच्या चांगल्यासाठी झटणे याचे नाव पुण्य. याचा अर्थ अकारण आपणाला छळणारे जे कोणी असतील ते पापी आहेत. आणि अशा पापी इसमांचा समाचार घेणे हे प्रत्येक
सज्जन माणसाचे कर्तव्य आहे. अशा माणसांशी व्यवहार सावधगिरीचा असला पाहिजे.
गांधीजींचे स्वप्न:-
गांधीजींचे या देशाबद्दल एक भव्य स्वप्न होते. या देशाने
कोणावरही आक्रमण करू नये किंवा कोणाचेही आक्रमण सहन करू नये असे त्यांचे मत होते. इथला नागरिक हा स्वातंत्र्यप्रिय, बेडर, कामसू आणि परोपकारी वृत्तीचा असावा असे त्यांना वाटत असे. या
आपल्या स्वप्नाला ते रामराज्य म्हणत. इथल्या हरिजन मुलालासुद्धा अंगी योग्यता असेल तर राष्ट्रपती होता यावे ही त्यांची अंतिम इच्छा होती.
स्वतंत्र देश प्रत्येकाच्याच विकासाचे रस्ते मोकळे करीत
असतो. आपणसुद्धा स्वतंत्र देशाचे नागरिक आहात. देशाच्या उत्कर्षात आपला भाग आहे. म्हणून आपली ही जबाबदारी आपण अधिक सावधगिरीने पार पाडली पाहिजे. अखेर हे काम श्रद्धेचे आहे. देशाच्या
भवितव्यावर ज्यांची श्रद्धा असेल ते फार मोठे काम करू शकतील. आपण अशा श्रद्धावानांपैकी एक बनावे अशी माझी इच्छा आहे.