धने घडतसे सेवा धने पावेती केशवा

धने घडतसे सेवा  
धने पावेती केशवा ||धृ ||
धने शांत होती दीन 
धने घड़े सदा दान ||1|;
धने राजर्षि होइजे । 
धने मानासी पाविजे ||2||
तुकड्या म्हणे दैवी धन । 
राहे मोक्षाचे कारण ||3||