धन कृपणाचे पाशी । त्यासी होय त्याची फाशी

धन कृपणाचे पाशी । 
त्यासी होय त्याची फाशी ||धृ ||
राहे धनाचा कुतरा । 
कोणा येऊ नेदी घरा ||1||
गावी जाहली बीमारी । 
तरी नये तो बाहेरी ||2||
तुकड्यादास म्हणे । 
मेल्या सर्प धनी होणे ||3||